13 February 15:35

लोकसभेच्या निवणूक आचारसंहितेपूर्वी कांदा अनुदान जमा करा- चव्हाण


लोकसभेच्या निवणूक आचारसंहितेपूर्वी कांदा अनुदान जमा करा- चव्हाण

कृषिकिंग, मुंबई: राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्याच्या बागलाण विधानसभा मतदार संघाच्या (सटाणा) आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांना यासंबंधीचे निवेदन त्यांनी दिले आहे.

१ नोव्हेंबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला अवघे २०० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यातही त्यासाठी अत्यंत जाचक अटी लागू करण्यात आल्याने राज्यातील जवळपास ५ लाख शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये विक्री करण्यात आलेल्या कांद्याला कोणतेही निकष न लावता सरसकट अनुदान देण्यात यावे. तसेच कांदा चाळींमध्ये असलेल्या कांद्याचे पंचनामे करून त्यांनाही अनुदान देण्यात यावे. अशी मागणीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.टॅग्स