31 December 07:00

लिंबूवर्गीय पिक सल्ला: असे करा डिंक्या रोगाचे नियंत्रण


लिंबूवर्गीय पिक सल्ला: असे करा डिंक्या रोगाचे नियंत्रण

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८

झाडावर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास खालील उपाययोजना करावी.
१) रोगग्रस्त सालीचा भाग पहारीने काढावा.
२) पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने (१० ग्रॅम + १ लीटर पाणी) साफ करून रोगग्रस्त भाग निर्जंतुक करावा.
३) बोर्डोमलम लावावा.
४) वरील मलम लावण्या अगोदर लक्षणे अधिक तिव्र असल्यास जखमेवर मेटॅलॅक्झील (एमझेड ७२) या बुरशीनाशकाची पेस्ट लावता येईल.
५) तसेच बुडाशी मेटॅलॅक्झील (एमझेड ७२) चे द्रावण टाकता येईल.
६) डिंक्या किंवा फायटोप्थोरा नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा (हारजीयानम + व्हीरीडी प्रत्येकी १०० ग्रॅम) + सुडोमोनस फ्लयुरोसन्स (१०० ग्रॅम) + शेणखत १ ते २ किलो प्रति झाड मिसळून जमिनीतून दयावे.

-डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे , अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, फळे (डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला)

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82