03 August 17:35

लासलगाव बाजार समितीत कांद्याला २६५० रूपये प्रतिक्विंटल भाव


लासलगाव बाजार समितीत कांद्याला २६५० रूपये प्रतिक्विंटल भाव

कृषिकिंग, लासलगाव: लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात आज ७५० रूपयांची वाढ झाल्याने कांद्याला सर्वाधिक २६५० रूपये प्रतिक्विंटल भाव नोंदवला गेला आहे. या भाववाढीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज बाजार समितीत भरुन आलेल्या जवळपास एक हजार वाहनांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधील आजचे कांद्याचे बाजारभाव:

बाजार समिती कमाल भाव किमान भाव
१. लासलगाव २६५० ८००
२. मनमाड २५०० १०००
३. पंढरपूर २४०० ६००
४. वाशी २२०० १८००
५. सातारा १७०० १०००

पावसाने गुजरातमधील कांदा खराब झाला आहे. तर मध्यप्रदेश राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून ८०० रूपये प्रतिक्विंटल दराने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करून त्याची विल्हेवाट लावली. त्यामुळे मध्य प्रदेशातून या कालावधीमध्ये इतर राज्यात जाणारा कांदा रवाना झाला नाही. कांद्याच्या भावात तेजी दिसत असली तरी गेल्या पाच महिन्यांपासून साठवणूक केलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी आणत आहे. पाच सहा महिन्यापांसून साठवलेल्या कांद्याचे वजन कमी होते. तसेच साठवणुकीमुळे खराब होणाऱ्या कांद्याला चाळी बाहेर फेकले जाते. त्यामुळे कांद्याच्या भावात तेजी आली तरी प्रत्यक्ष या तेजीचा फारच कमी लाभ कांदा उत्पादकांना होणार आहे.

इतर राज्यांच्या कांदा उत्पादनाची सध्याची परिस्थिती, कांद्याचा उपलब्ध साठा, निर्यातीची परिस्थिती, उत्पादन आकडेवारी, कांदा बियाण्यांचा घसरलेला खप अशा अनेक अनुषंगाने कृषिकिंग मार्केट रिसर्च टीमने कांदा पिकाच्या भविष्यातील वाटचालीच्या घेतलेल्या वेधासंबंधी आज सकाळीच कृषिकिंगने सविस्तर बातमी प्रसिद्ध केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.krushiking.com/newsdetail.php?goytrarenyarjf&100102632टॅग्स