19 October 18:42

लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण


लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण

कृषिकिंग, लासलगाव(नाशिक): मागणी कमी झाल्याने लासलगाव बाजार समितीत आज (शुक्रवारी) उन्हाळ कांद्याच्या भावात ६०० रुपयांची घसरण झाली आहे. आज लासलगाव बाजार समितीत कांद्याला किमान ८०० रुपये, कमाल १९१९ रुपये तर सरासरी १६५० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे. आज दिवसभरात ५५० वाहनातून कांदा बाजार समितीत दाखल झाला. गुरुवारी दसरा असल्याने लिलाव बंद होते.

लासलगाव बाजार समितीत बुधवारी कांद्याच्या दरात ४३० रुपयांची तेजी येऊन, तो २५५० रुपये प्रतिक्विंटल पोहचला होता. बुधवारी उन्हाळ कांद्याची आवक ४२५ वाहनातून झाली व बाजारभाव किमान ८०० ते कमाल २५५० तर भाव सरासरी २२०० रुपये होता. तर मंगळवारी उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान ७००, कमाल २१२० तर सरासरी १७२० रुपये दर मिळाला होता.टॅग्स