05 October 14:40

लाल कांदा बाजारात दाखल; उन्हाळ कांद्याच्या दरावर परिणाम नाही


लाल कांदा बाजारात दाखल; उन्हाळ कांद्याच्या दरावर परिणाम नाही

कृषिकिंग, उमराणे(नाशिक): नाशिक जिल्ह्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल (पावसाळी) कांदा विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली असुन, या कांद्याला १२६० रूपये इतका सर्वोच्च दर मिळाला आहे. दरवर्षी दसऱ्यानंतरच लाल कांदा बाजारात विक्रीस येतो. परंतु काही शेतकऱ्यांनी लवकर लागवड केल्याने दस-याच्या आधीच हा कांदा काढणीला आला असून, आठवड्याभरापासुन अत्यल्प प्रमाणात तो बाजारात दाखल होत आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सद्यस्थितीत उन्हाळी ( गावठी ) कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र, लाल कांदा बाजारात दाखल झाला असला तरी त्याचा उन्हाळी काद्यांच्या दरावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

चालु वर्षी बहुतांश ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने कांदा लागवड अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. त्यातच नद्या, नाले, विहिरींना अद्यापही पाणीच नसल्याने झालेली लाल कांद्याची लागवडही धोक्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात लाल काद्यांची आवक वाढण्याची शक्यता नसुन, अजुन काही दिवस तरी उन्हाळ (गावठी) कांद्यावरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.टॅग्स