27 November 07:00

लसून सल्ला: बीजप्रक्रिया व तणनियंत्रण


लसून सल्ला:  बीजप्रक्रिया व तणनियंत्रण

स्त्रोत: कृषिकिंग ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ लागवडीच्यापूर्वी किंवा लागवडीच्यावेळी ऑक्सिफ्लोरफेन (२३.५ टक्के ईसी) १.५ ते २ मि.ली. प्रति लिटर किंवा पेंडीमिथेलिन (३० टक्के ईसी) ४ मि.ली. प्रति लिटर या प्रमाणात या तणनाशकांचा वापर करावा.
बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात लसणाच्या कळ्या दोन तास बुडवून नंतरच लागवड करावी. लसणाच्या कळ्या टोकण करून लावाव्या लागतात. कळ्या १०-१५ सें.मी. अंतरावर व २ सें.मी. खोलीवर लावाव्यात. एक हेक्टर लागवडीसाठी ४०० ते ५०० किलो कळ्या लागतात.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे.