12 April 08:30

राज्यातून ८८ हजार ८९० टन द्राक्षे युरोपात निर्यात


राज्यातून ८८ हजार ८९० टन द्राक्षे युरोपात निर्यात

कृषिकिंग, नाशिक: राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून १५ एप्रिल पर्यंत संपण्याची शक्यता आहेत. नाशिक, नगर व सांगली जिल्ह्यातील काही मोजक्‍याच बागा शिल्लक आहेत. या स्थितीत मागील आठवड्याच्या अखेरपर्यंत राज्यातून एकूण ६७४३ कंटेनर मधून ८८,८९० टन द्राक्षे युरोपीय देशांत निर्यात झाली आहे. येत्या आठवड्यात ही निर्यात ७ हजार कंटेनरचा आकडा पार करेल अशी शक्यता आहेत.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात द्राक्षांचा तुटवडा जाणवत असतांना देशांतर्गत व जागतिक बाजारातून मागणी वाढली. देशांतर्गत बाजारात प्रति किलोला ३५ ते ५५ व सरासरी ४५ रुपये दर मिळाला. निर्यातक्षम द्राक्षांना या वेळी किलोला ५० ते ८० व सरासरी ६५ रुपये दर मिळाला.

भारतातील महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यातून प्रामुख्याने निर्यात होते. महाराष्ट्रातून ८८,८९० टन तर कर्नाटकमधून अवघी ९२ टन द्राक्ष निर्यात युरोपात झाली आहे. युरोपातील नेदरलँड, जर्मनी, इंग्लंड, डेन्मार्क, फिनलंड, बेल्जियम, नॉर्वे, लॅटविया, फ्रान्स, लिथुआनिया, इटली, स्वित्झर्लंड, स्पेन, आयर्लंड, स्वीडन, ऑस्ट्रीया, झेक गणराज्य, ग्रीस या देशात निर्यात झाली.टॅग्स