26 October 09:59

राज्यातील २० हजार गावांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणार- मुख्यमंत्री


राज्यातील २० हजार गावांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणार- मुख्यमंत्री

कृषिकिंग, वर्धा: प्रत्येक गावात घरोघरी पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. १५ वर्षांपासून रखडलेल्या ग्रामीण पेयजल योजनांसाठी केंद्र शासनाने ८ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून राज्यातील २० हजार गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात येईल." असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पिपरी मेघे व १३ गावे वाढीव पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर हेही उपस्थित होते.