23 October 15:31

राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा


राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

कृषिकिंग, मुंबई: राज्यात १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यामध्ये प्रामुख्याने ३२ जिल्ह्यांमधील ११२ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ तर ६० तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या १८० तालुक्यांमध्ये उपाययोजना सुरु करण्यास सुरुवात होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.

राज्यात सरासरी केवळ ७७ टक्के पाऊस पडला आहे. दुष्काळसदृश्य भागाची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राची टीम महाराष्ट्रात येईल. त्यानंतर मदतीची घोषणा केली जाणार आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान, जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी-पंप बिलात सूट व वीज जोडणी खंडित न करणे, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थांच्या परीक्षा शुल्कात सूट, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर योजना या उपाययोजना या तालुक्यांमध्ये तात्काळ लागू करण्यात आल्या आहेत.