14 February 16:39

राज्यातील गारपीटग्रस्तांना प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रु. मदत जाहीर


राज्यातील गारपीटग्रस्तांना प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रु. मदत जाहीर

कृषिकिंग, मुंबई: गारपिटग्रस्तांसाठी सरकारने आज तातडीने अनुदान जाहीर केले आहे. कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी ६ हजार रुपये तर जिरायतीसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ५०० रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. मोसंबी आणि संत्र्या उत्पादकांना हेक्टरी २३ हजार ३०० रुपये, केळी उत्पादकांना हेक्टरी ४० हजार रुपये, आंब्याला हेक्टरी ३६ हजार ७०० रुपये भरपाई मिळणार आहे. तर विमा नसललेल्या फळबाग शेतकऱ्यांनाही हेक्टरी अठरा हजाराची मदत मिळणार आहे.

पीकविमा, आणि एनडीआरएफच्या नियमानुसार ही शासकीय मदत दिली जाणार आहे. रविवारी मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गारपिटीमुळे पहिल्या दिवशी मराठवाडा आणि विदर्भात १.२७ लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले तर दुसऱ्या दिवशी ६४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात फळबागांसह, रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक गारपिटीमुळे उद्धवस्त झाले आहे. फळबागांचीही मोठी नासधूस झाली आहे. त्यावर सरकारने गारपिट ग्रस्तांसाठी ही तातडीची मदत जाहीर केली आहे.