16 August 11:48

राज्यात ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता- आयएमडी


राज्यात ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या शुक्रवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ऐन पावसाळ्यात पीके करपल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याला या पावसाने दिलासा मिळणार आहे.

विशेष म्हणजे मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढच्या २४ तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पूरता हतबल झाला आहे. जुलैमध्ये राज्यातील ३५५ पैकी तब्बल २२३ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्केही पाऊस झालेला नाही. त्यातच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीच्या २५ टक्केही कृपा दाखवलेली नाही. ऐन मौसमात पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकही चिंतेत आहेत. त्यामुळे आता तरी पावसाची प्रतिक्षा संपेल, अशी आशा बळीराजाला आहे.टॅग्स