14 November 12:25

राज्यात १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता


राज्यात १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता

कृषिकिंग, पुणे: “राज्यभरात थंडीची चाहुल लागल्यानंतर सर्वत्र हुडहुडी भरली आहे. मात्र १८ ते २१ नोव्हेंबरला पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात हवेच्या दिशा आणि दाब यामध्ये बदल होत आहे. परिणामी समुद्रात बाष्प निर्मिती सुरू झाल्याने येत्या १८ नोव्हेंबरपासून राज्यात पावसाचा अंदाज आहे.” अशी माहिती ज्येष्ठ कृषी-हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

“पुणे, अहमदनगर जिल्ह्यासह मराठवाड्याचा पुर्वेकडील भाग तसेच विदर्भाच्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. हा पाऊस अल्पशा प्रमाणात होईल, त्याचा ज्वारी, तूर या पिकांच्या वाढीसाठी फायदा होईल. तर भाजीपाला, फळे, द्राक्ष, डाळिंबासाठी हा पाऊस थोडा त्रासदायक ठरू शकतो.” असेही त्यांनी सांगितले आहे.टॅग्स