30 August 09:50

राज्यात पाऊस पुन्हा विश्रांती घेण्याची शक्यता- आयएमडी


राज्यात पाऊस पुन्हा विश्रांती घेण्याची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, मुंबई: नैऋत्य मॉन्सूनचा आस (ट्रफ) उत्तर भारताकडे सरकल्याने महाराष्ट्रात पाऊस पुन्हा विश्रांती घेण्याची शक्यता आहे. १५ ऑगस्टपासून सक्रिय असलेल्या मॉन्सूनच्या हालचाली मंदावल्याने राज्यात ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. राज्यावरील दाब वाढला आहे. या काळात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, मॉन्सून सध्या देशाच्या उत्तर भागात सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस सध्या पंजाबच्या भटिंडापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर भारतात असलेला पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा मॉन्सूनच्या आसाकडे सरकत आहे. परिणामी महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरात राज्यात मॉन्सूनची सक्रियता कमी होऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात खंड पडण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.टॅग्स