20 August 11:51

राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढणार- आयएमडी


राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढणार- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज (२० ऑगस्ट) राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) देण्यात आला आहे.

रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. दरम्यान, सध्यस्थितीत पाऊस पडण्यास पोषक स्थिती निर्माण झाल्याने मंगळवारपर्यंत (२१ ऑगस्ट) विदर्भ, कोकणात बहुतांशी ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. असेही भारतीय हवामानशास्र विभागाकडून सांगण्यात आले आहे.टॅग्स