14 February 12:04

राज्यात आतापर्यंत १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना कांदा अनुदान जमा


राज्यात आतापर्यंत १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना कांदा अनुदान जमा

कृषिकिंग, पुणे: दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० अनुदान देण्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आत्तापर्यंत राज्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक ७१ हजार ४३८ अनुदानाचा लाभ मिळाला आहे. त्याखालोखाल अहमदनगर जिल्ह्यातील ४८ हजार ९११ आणि पुणे जिल्ह्यातील १२ हजार २२५ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे.

१ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत कांद्याचे दर घसरणीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यातील ३१ डिसेंबरपर्यंतची माहिती प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आली असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी करून त्यांच्याही बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे.

राज्यातील सात विभागातील १८ जिल्ह्यामधील ७७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ लाख ७४ हजार शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लेखापरीक्षक अधिकाऱ्यांनी छाननी केली. त्यानंतर तालुका स्तरावरील समिती १ लाख ६० हजार ६९८ शेतकरी पात्र ठरविले आहेत. या शेतकऱ्यांनी ५७ लाख ४० हजार ११७ कांद्याची विक्री केली असून, त्यांना ११४ कोटी ८० लाख २३ हजार ४३६ रुपये अनुदान देण्यात आले आहे.टॅग्स