18 May 10:35

राज्यात आज व उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता- आयएमडी


राज्यात आज व उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: राज्यात आज आणि उद्या अर्थात शुक्रवारी आणि शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे येथील भारतीय हवामानशास्र विभागाने व्यक्त केला आहे. तर विदर्भात या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

तसेच हवामान विभागाने सांगितले आहे की, “मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर मराठवाडा व विदर्भात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर शनिवारी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.” दरम्यान, या हंगामातील पहिले चक्रीवादळ सागर अरबी समुद्रात तयार झाले असून, ते एडनच्या आखाताकडे सरकले आहे. मात्र, या सागरी वादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नसल्याचे हवामानशास्त्र विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.टॅग्स