16 November 12:23

राज्य सरकार शेतकरी-वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे- मुख्यमंत्री


राज्य सरकार शेतकरी-वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे- मुख्यमंत्री

कृषिकिंग, शनिशिंगणापूर(अहमदनगर): राज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी आहे. कर्जमाफी, बोंडअळी अनुदान, इतर पिकांसाठी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचे धोरण शासनाने घेतले. अडचणीच्या काळात शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अहमदनगरमधील शनि शिंगणापूर येथे शेतकरी मराठा महासंघ आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने आयोजित शेतकरी-वारकरी महासंमेलनाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

शेतकरी आणि वारकरी यामध्ये फरक नाही. प्रत्येक शेतकरी हा वारकरी आणि वारकरी हा शेतकरी आहे. कोणत्याही अस्मानी संकटाशी सामना करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. भागवत धर्माने जो मार्ग दाखविला त्याच मार्गाने राज्यातील शेतकरी आणि वारकऱ्यांचे मार्गक्रमण सुरु आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहे.