16 July 18:44

राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाची सदाभाऊंनी उडवली खिल्ली!


राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाची सदाभाऊंनी उडवली खिल्ली!

कृषिकिंग, नागपूर: स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून राज्यात पुकारलेले दूध आंदोलन येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नागपूर येथील अधिवेशनात प्रसिद्धीमाध्यमांसोबत बोलताना केला आहे. सभागृहाच्या परिसरात बोलताना त्यांनी, गेल्या तीस वर्षांपासून आपण आंदोलनातूनच वाटचाल करीत आहोत, टँकरमधून दूध कसे फेकायचे, त्यात किती पाणी व किती दूध असते हे आम्हाला ठाऊक आहे, त्यामुळे या आंदोलनाला फारसे महत्त्व नाही, असे मत व्यक्त करत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.

आंदोलनात शेतकरी कमी व पक्षाचे कार्यकर्ते जास्त असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. आंदोलन करण्यापूर्वी त्यांनी सरकारला नोटीस द्यायला हवी होती, चर्चेतून प्रश्न सोडवता आला असता पण त्यांनी असे न करता हे आंदोलन सुरू केले. चर्चेसाठी सरकार केव्हाही तयार आहे. असेही ते म्हणाले आहे.