13 April 17:28

राजस्थानात कांदा, लसूण खरेदीला केंद्राची मंजुरी


राजस्थानात कांदा, लसूण खरेदीला केंद्राची मंजुरी

कृषिकिंग, नवी दिल्ली: राजस्थानमधील शेतकऱ्यांकडून कांदा व लसूण खरेदीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यात प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून २.६ लाख मेट्रिक टन कांदा आणि लसूण उत्पादक शेतकऱ्यांकडून १.५४ लाख मेट्रिक टन लसूण बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत खरेदी करण्यास केंद्राने आज मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्र सरकारने राजस्थान सरकारला ६६२.२६ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे.

दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकाने मागील महिन्यात १५ मार्चला राजस्थानात २०१७-१८ च्या रब्बी हंगामातील ४ लाख मेट्रिक टन हरभरा आणि ८ लाख मेट्रिक टन मोहरी हमीभावाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.टॅग्स