12 February 17:10

राजकीय प्रचारसभा उधळून लावणार; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा


राजकीय प्रचारसभा उधळून लावणार; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा

कृषिकिंग, नाशिक: केंद्र सरकारने लोकसभा निवणुकीपूर्वी कांदा प्रश्नावर कायस्वरूपी तोडगा काढावा. त्यासाठी विरोधी पक्षांनीही सरकारवर दबाव आणून सहकार्य करावे. अन्यथा आगामी लोकसभा निवणुकीच्या प्रचारासाठी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांना प्रचारासाठी फिरकू देणार नाही. असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.

यावर्षी नाशिकसह राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी भाव न मिळाल्याने आर्थिक दृष्टचक्रात सापडला आहे. त्यामुळे हे दृष्टचक्र भेदण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आवाज उठविणार आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका लक्षात घेता राजकीय मंडळींच्या सभा उधळून लावणार आहे. असेही ते म्हणाले आहे.

याआधी भाजपचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींची भेट घेऊन कांदा प्रश्नाच्या गंभीरतेवर चर्चा करणार असल्याचे दिघोळे यांनी सांगितले आहे.