03 April 08:30

रस, मनुक्यासाठी द्राक्षाचे नवे वाण विकसित


रस, मनुक्यासाठी द्राक्षाचे नवे वाण विकसित

कृषिकिंग, पुणे: पुणे येथील आघारकर संशोधन संस्थेने ‘एआरआय-५१६’ ही द्राक्षाची नवी जात विकसित केली आहे. सध्या देशभरातील सात संशोधन केंद्रांवर या जातीचा इतर पाच रसांच्या द्राक्ष जातींच्या बरोबरीने तुलनात्मक अभ्यास सुरू आहे. राज्यातील द्राक्ष बागायतदारांकडेही या जातीच्या चाचण्या सुरू आहेत. पुढील वर्षी ही जात लागवडीसाठी उपलब्ध होईल, असे संस्थेतील तज्ज्ञांनी सांगितले आहे.

“आम्ही बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन रस आणि मनुकानिर्मितीला उपयुक्त ठरणारी ‘एआरआय-५१६’ ही द्राक्ष जात विकसित केली. कटावबा आणि ब्यूटी सिडलेस या जातींच्या संकरातून ही जात विकसित करण्यात आली आहे. द्राक्ष मणी निळसर काळ्या रंगाचे आहेत.” अशी माहिती विभागातील तज्ज्ञ डॉ. सुजाता तेताली यांनी दिली आहे.

तसेच जातीचे फळ छाटणीपासून ११० ते १२० दिवसांत तयार होते. लांबट व सुटसुटीत गोलाकार मणी, एकसमान असतो. तर केवडा व भुरी रोगास मध्यम आणि करपा रोगास प्रतिकारक अशी ही जात आहे. या जातीपासून प्रतिवेल १५ किलो उत्पादन मिळते. ही या जातीची वैशिष्ट्य आहेत. असेही त्या म्हणाल्या आहेत.टॅग्स