01 June 12:51

येत्या ४८ तासात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता


येत्या ४८ तासात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

कृषिकिंग, पुणे: येत्या ४८ तासात दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात कमालीचा उकाडाही जाणवत आहे. तर दिलासा देणारी गोष्ट म्हणजे मान्सूनची वेगवान वाटचाल सुरू असून कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे.

आज गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडलाय. दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागारात निर्माण झाल्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू आहे. मुंबईतही पावसाचे वातावरण असून, आज सकाळी थोड्या फार प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला आहे.