25 May 10:44

येत्या ४८ तासांत मॉन्सून अंदमानात; २८ मे ला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस- आयएमडी


येत्या ४८ तासांत मॉन्सून अंदमानात; २८ मे ला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या मेकुनू चक्रीवादळाचा अडथळा दूर झाल्याने येत्या ४८ तासांत मान्सून अंदमानात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या मेकुनू चक्रीवादळामुळे २७ मे रोजी कोकण, गोव्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़. तर २८ मे रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़. असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मात्र, असे असले तरी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने गेल्याने मान्सून सक्रीय होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'मेकुनू' चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रगतीत अडथळा आल्याने त्याचे दक्षिण अंदमान समुद्रातील आगमन लांबले आहे. सर्वसाधारणपणे २० मेपर्यंत मॉन्सून अंदमानात दाखल होतो. यावर्षी मेकुनूमुळे मॉन्सूनच्या आगमनात अडचण निर्माण झाली आहे. परंतु, आता हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने दूर सरकले गेले असून, मॉन्सून सक्रीय होण्याच्या दृष्टीने पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे़टॅग्स