29 August 14:26

येत्या ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईची झाली तुंबई


येत्या ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईची झाली तुंबई

कृषिकिंग, नवी दिल्ली: येत्या ३ दिवसांत देशातील जवळपास १५ राज्यांतील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांसह, गोवा, मध्यप्रदेशचा पश्चिम भाग, केरळ, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, आणि ईशान्येकडील अनेक राज्यांचा समावेश आहे.

तसेच हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरात अतिवृष्टीसह सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईत रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुबईसह सर्वच उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’ अशी बजावणीही मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे. पावसाचा जोर पाहता एऩडीआरएफच्या तीन तुकड्या तयार ठेवण्यात आल्या असून पुण्याहूनही दोन अतिरिक्त तुकड्या बोलावल्यात आल्या आहेत. त्यातच आता मुंबईत पुढच्या २४ तासांत मुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

त्यातच आता येत्या २४ तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.टॅग्स