04 May 14:15

येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता- आयएमडी


येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: येत्या २४ तासात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील इतर भागात हवामान कोरडे राहणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे येत्या २४ तासात विदर्भासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्याहसह मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

या दरम्यान, शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी. या अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच आपल्या धान्यांना योग्य त्या ठिकाणी झाकून ठेवावे.

तर दुसरीकडे उत्तराखंड, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान या उत्तरेकडील राज्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वादलि वाऱ्यासह तुफान पावसाचा कहर पावसाला मिळतोय. त्यातच आता पुन्हा हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये येत्या ७२ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफानाची शक्यता व्यक्त केली आहे. यामध्ये मध्यप्रदेश राज्याला पुढील २४ तासांमध्ये या तुफानाचा फटका बसू शकतो. तर बिहार, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, आणि राजधानी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये तुफानासह जोरदार पाऊस होऊ शकतो. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांत उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये झालेल्या या वादळी वाऱ्यासह तुफानी पावसामुळे आतापर्यंत ११० लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये उत्तरप्रदेशातील ७३ तर राजस्थानच्या ३३ लोकांचा समावेश आहे. तर २०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. उत्तरप्रदेशातील आग्रा आणि राजस्थानातील धौलपुर क्षेत्र हे या वादळी तुफानापासून सर्वाधिक प्रभावित झाले आहे. हे वादळ इतक भयानक आहे की, त्यामुळे मोठ-मोठे झाड जमीनदोस्त होत आहे. अनेक घरांची पडझड झाली असून, अनेक ठिकाणी विजेचे पोल जमिनीवर कोसळले असून, वीजपुरवठा खंडित झाला आहे.टॅग्स