04 June 12:31

येत्या २४ तासात राज्यभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता


येत्या २४ तासात राज्यभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: येत्या २४ तासात राज्यभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज मुंबई येथील कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. पुढील २४ तासात प्रामुख्याने रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, जळगाव, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, काल झालेल्या मान्सून पूर्व पावसाने राज्यभर हजेरी लावली. तर यावर्षी महाराष्ट्रात मान्सून वेळेआधी दाखल होण्याची शक्यता आहे. असे गोवा वेधशाळेकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी ८ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. यावर्षी तो ६ जूनलाच महाराष्ट्रात प्रवेश करेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. केरळमध्ये मान्सूनने दोन दिवस आधीच धडक दिली आणि आता तो गोव्यात सक्रीय होत आहे. सध्या कारवारपर्यंत मान्सून घुटमळला आहे. त्यामुळे आता राज्यातल्या जनतेला आणखी दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागणार आहे.टॅग्स