14 May 15:13

येत्या २४ तासांत विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस- आयएमडी


येत्या २४ तासांत विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस- आयएमडी

कृषिकिंग, मुंबई: येत्या २४ तासांत विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याची शक्यता मुंबईच्या कुलाबा येथील भारतीय हवामानशास्र विभागाने वर्तवली आहे. हा मॉन्सून सुरू होण्याआधीचा पाऊस असणार आहे. मॉन्सूनपूर्व पाऊस यावर्षी लवकर आल्याने मॉन्सूनही लवकरच दाखल होईल. असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

दरम्यान, मॉन्सून त्याच्या दरवर्षीच्या निर्धारित वेळेपेक्षा चार दिवस आधीच अर्थात २८ मे रोजी केरळात दाखल होईल. असा अंदाज काल स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला आहे. मॉन्सून २० मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर तर २४ मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल. आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरावरुन त्याचा प्रवास सुरू होईल, असे स्कायमेटने आपल्या अंदाजात म्हटले आहे. मॉन्सून दरवर्षी साधारणतः केरळमध्ये १ जूनला दाखल होतो.

दरम्यान, पारा ४७ अंशांवर पोहोचलेला आहे. विदर्भातील चंद्रपुरात तर ४७ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक पावसाची वाट पाहत असून, मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच शेतकरी राजाचीही लगभग सुरु होणार आहे.टॅग्स