15 April 16:23

येत्या २४ तासांत राज्यातील अनेक भागांत विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता- आयएमडी


येत्या २४ तासांत राज्यातील अनेक भागांत विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: येत्या २४ तासांमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.

राजस्थानजवळील चक्रीय वात स्थितीमुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दोन्हीचा परिणाम म्हणून राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतही तुरळक पावसाची शक्यता आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण, जोरदार अवकाळी पाऊस, गारा पडणे अशा घटना घडत आहेत.

दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काल दिवसभरात पुणे, नाशिक, दिंडोरी, मनमाड, मुंबई, जळगाव या पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारा पडल्याचेही वृत्त आहे. ज्यामुळे गहू, आंबा आणि द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.टॅग्स