30 August 14:49

येत्या २ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता


येत्या २ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: येत्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांतही अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. तर मराठवाड्यातही अशाच प्रकारचा पाऊस होऊ शकतो, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.टॅग्स