19 June 18:12

येत्या आठवड्याच्या सुरुवातीला मॉन्सून पुन्हा सक्रीय होणार- आयएमडी


येत्या आठवड्याच्या सुरुवातीला मॉन्सून पुन्हा सक्रीय होणार- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: ‘सध्यस्थितीत मॉन्सूनचा वेग हा काहीसा मंदावला असला तरी या आठवड्याच्या शेवटी मॉन्सून तेज वाटचालीसह पुन्हा सक्रीय होऊ शकतो. ओडीसासह उत्तर-पूर्वेकडील काही भागात २३ व २५ जून रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर येत्या २४ तासांत कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात, उप-हिमालयीन प. बंगाल सिक्कीम, आसाम आणि मेघालय मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.’ असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ‘२८ मे ते १५ जून या काळात मॉन्सूनने आपली वाटचाल एकदम तेज गतीने केली. मात्र, त्यानंतर मॉन्सूनची गती ही पूर्णपणे मंदावली आहे. आणि याचा थेट परिणाम हा देशातील खरीपातील पेरणीवर झाला आहे. तरी देशातील त्या-त्या प्रदेशात योग्य तो पाऊस झाल्यासच पेरणी करावी. असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.टॅग्स