18 November 11:00

युवराज, सुलतान आणि आता विराट; जगातील सर्वात महागडे रेडे


युवराज, सुलतान आणि आता विराट; जगातील सर्वात महागडे रेडे

कृषिकिंग, लखनऊ(उत्तरप्रदेश): हरियाणा, पंजाबनंतर आता उत्तरप्रदेशमध्येही रेडापालनाचा व्यवसाय विस्तारतो आहे. उत्तरप्रदेशातील मेरठ येथील शेतकरी उपेंद्र सिंह हे मागील दीड वर्षांपासून आपल्या विराट (रेडा) वर हजारो रुपये खर्च करत आहेत. त्यांना आशा आहे की सहा महिन्यांनंतर विराट सीमेन उत्पादनातून त्यांना लाखो रुपयांची कमाई मिळवून देईल.

"आमच्या जिल्ह्यात कृषी मेळा भरला होता. या मेळाव्यात हरियाणातील 'युवराज' हा सीमेन उत्पादनातून लाखोंची कमाई करून देणारा रेडा पाहिला होता. त्यावेळी मी युवराजच्या सीमेनपासून २० लिटर दूध देणाऱ्या म्हशीचे ब्रीडिंग केले होते. त्यातून विराटचा जन्म झाला. विराट सध्या दीड वर्षाचा झाला असून, येत्या सहा महिन्यात त्याच्यापासून सीमेन डोज मिळण्यास सुरुवात होईल." असे उपेंद्र यांनी सांगितले आहे.

उपेंद्र यांच्याकडे सध्या मुऱ्हा प्रजातीच्या २० म्हशी आहेत. विराटची दिनचर्या सांगताना उपेंद्र यांनी सांगितले आहे की, दररोज १० किलो सफरचंद, १० किलो दूध, आणि ३ चारा (वैरण) दिली जाते. याशिवाय त्याच्यासाठी ८ ते ९ फुटांचा तलावही तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो जवळपास दोन तास पहुडतो. त्याच्या देखरेखीसाठी २ जण नेहमी कार्यरत असतात. उपेंद्र हे मेरठ जिल्ह्यातील पहिले शेतकरी आहे, जे रेडा पालन करत आहे. शामली आणि मुज्जफरनगर मधील काही डेअरी व्यावसायिकांनी रेडापालन सुरु केले आहे. हळूहळू लोक याकडे वळत आहेत. अशी माहितीही उपेंद्र यांनी दिली आहे.

भारतामध्ये रेड्यांच्या १३ प्रजातींपैकी मध्य हरियाणामधील मुऱ्हा म्हशीला सर्वाधिक मागणी आहे. या प्रजातीच्या म्हशीला प्रजात सुधारक म्हणून ओळखले जाते. सर्वाधिक दूध देण्याची क्षमता असल्यामुळे दुग्धव्यावसायिकांमध्ये या प्रजातीला सर्वाधिक मागणी आहे. भारतातील एकूण दूध उत्पादनापैकी ५४ टक्के दूध म्हशींपासून मिळते. १९ व्या पशुगणनेनुसार, देशभरात सध्या ५१ कोटी पशु आहेत. यामध्ये दुधाळ जनावरांच्या संख्येत ४८.६४ मिलियन वरून ५१.०५ मिलियनपर्यंत वाढ झाली आहे. जी मागील पशुगणनेच्या तुलनेत ४.९५ टक्क्यांनी अधिक आहे.

हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील करमवीर सिंह यांच्याकडे 'युवराज' नावाचा ९ वर्षाचा १४ क्विंटल वजनाचा रेडा आहे. सध्यस्थितीत युवराजची किंमत सव्वा ९ कोटींपेक्षा अधिक आहे. युवराजच्या १४१६ मिलीलिटर सीमेनपासून आतापर्यंत ७०० म्हशींचे ब्रीडिंग करण्यात आले आहे. युवराजची देखभाल करण्यासाठी एमबीए झालेल्या पात्रतेचे युवक दिवसातून दोन वेळा मोहरीच्या तेलाने मालिश करतात. याच खासियततेमुळे युवराजने आतापर्यंत २२ वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहे.

तर हरियाणाच्याच कैथल जिल्ह्यातील नरेश यांच्याकडे 'सुलतान' नावाचा रेडा आहे. देशातील अनेक स्पर्धांमध्ये सुलतानने बाजी मारली आहे. लोक सुलतानला खरेदी करण्यासाठी कोटींची बोली लावतात, मात्र, नरेशला त्याची विक्री करायची नाही. कारण सुलतानपासून वर्षाला ३० ते ३५ हजार डोज सीमेन तयार होते. सीमेनच्या एका डोजची किंमत ३०० रुपये इतकी असते. सुलतानपासून दिवसाला दोन वेळा सीमेन काढले जातात. ज्याची किंमत वर्षाला लाखोंच्या घरात आहे.

दरम्यान, 'युवराज' आणि 'सुलतान' बाबत "रेडा बनवू शकतो तुम्हांला लखपती; वाचा कसे ते?..." या शीर्षकाखाली कृषिकिंगने वृत्त प्रसिद्ध केले होते. बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://bit.ly/2QHGkjxटॅग्स