06 February 15:13

युरोप व रशियातील भारतीय द्राक्ष निर्यात २८ टक्क्यांनी वाढली


युरोप व रशियातील भारतीय द्राक्ष निर्यात २८ टक्क्यांनी वाढली

कृषिकिंग, मुंबई: युरोपियन युनियन आणि रशिया सारख्या पारंपरिक बाजारपेठांमध्ये मागणी वाढल्यामुळे ताज्या द्राक्षांच्या निर्यातीला यावर्षी चांगली सुरुवात झाली आहे. जानेवारीच्या मध्यावधीत सुरु झालेल्या निर्यातीत दोन आठवड्यानंतर २८ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. युरोपियन युनियन आणि रशियाच्या बाजारपेठेत यावर्षी आतापर्यंत १५ हजार ३८३ टन इतक्या द्राक्षांची निर्यात करण्यात आली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत १२ हजार ५८ टन इतकी नोंदवली गेली होती.

निर्यात होत असलेल्या थॉमसनच्या पांढऱ्या जातीसाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. पांढऱ्या आणि काळी जातींच्या द्राक्षांच्या दरात थोडा सुधार झाला असून, लाल प्रजातीच्या द्राक्षांना प्रति किलो ८० ते ९० रुपयांचा दर मिळत आहे. दरम्यान, द्राक्ष शेतीला ओखी वादळाचा फटका बसला तरी त्याचा निर्यातीवर तरी कोणताही परिणाम दिसून येत नाही. कारण युरोप आणि रशियामधून द्राक्षांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. अशी माहिती भारतीय द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी दिली आहे.टॅग्स