03 April 17:59

यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार; देशातील काही भागात दुष्काळाची शक्यता- स्कायमेट


यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार; देशातील काही भागात दुष्काळाची शक्यता- स्कायमेट

कृषिकिंग, मुंबई: यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडेल. असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या ९३ टक्के इतकाच पाऊस पडेल, अशी शक्यता स्कायमेट या हवामान संस्थेनं वर्तवली आहे.

यावर्षीच्या पावसावर अल निनोचा परिणाम जाणवेल, असं स्कायमेटनं म्हटलं आहे. तसेच यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ५५ टक्के असेल, असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे.

पॅसिफिक महासागरात सक्रिय असलेल्या अल निनोमुळे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आशिया, भारताच्या काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल. तर अमेरिकेच्या मध्य पश्चिम भागासह ब्राझीलमध्ये जोरदार पाऊस होईल, असेही स्कायमेटनं आपल्या अंदाजात म्हटलं आहे.