28 March 16:10

यावर्षी देशभरात चांगल्या पावसाची शक्यता; मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव नाही- आयएमडी


यावर्षी देशभरात चांगल्या पावसाची शक्यता; मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव नाही- आयएमडी

कृषिकिंग, नवी दिल्ली: "यावर्षी भारतीय मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव होणार नसून, देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे." अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) महासंचालक के. जे. रमेश यांनी स्पष्टपणे दिली आहे.

यापूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अनेक देशांच्या हवामान संस्थांसह स्कायमेट या भारतीय हवामान संस्थेने मॉन्सूनच्या पर्जन्यावर एल निनोचा प्रभाव राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, आता आयएमडीने भारतीय मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव होणार नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे.

त्यांनी पुढे बोलताना म्हटलंय की, मॉन्सूनच्या स्थितीबाबत सध्या बोलणं योग्य होणार नाही. मात्र, भारतीय भूमीवरील मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.