30 December 16:18

मोदींना शेतकऱ्यांप्रती सहानुभूती नाही- शरद पवार


मोदींना शेतकऱ्यांप्रती सहानुभूती नाही- शरद पवार

कृषिकिंग, अहमदनगर: "काँग्रेसने मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीला पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉलीपॉप म्हणून हिणवतात. यावरून नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नसल्याचे दिसून येते," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. ते आज (रविवार) अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

या राज्यांनी कर्जमाफीसारखा धाडसी निर्णय घेतल्यानंतर आत्महत्या व शेतकऱ्यांवरील संकटाची स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून राज्यांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज असताना, पंतप्रधानांनी कर्जमाफीला लॉलिपॉप म्हटलं आहे. याचा अर्थ शेतकरी वर्गासाठी धाडसाने आर्थिक झळ सोसून मदत म्हणून घेतलेल्या निर्णयाला केंद्र सरकारची सहानुभूती नाही. असेही पवार म्हणाले आहे.

यावेळी त्यांनी अहमदनगर महानगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या युतीसंदर्भातही भाष्य केले. भाजपला पाठिंबा देणाऱ्या १८ नगरसेवकांवर लवकरच कारवाई होईल, असे संकेत पवार यांनी दिले आहे. याशिवाय या बंडखोर नगरसेवकांना त्यांनी पक्षातून काढून टाकायचे ठरवले असल्याची माहिती समोर येत आहे.