18 April 11:56

मोदी सरकारने देशातील शेतकरी, तरुणांना देशोधडीला लावलं- शरद पवार


मोदी सरकारने देशातील शेतकरी, तरुणांना देशोधडीला लावलं- शरद पवार

कृषिकिंग, कोल्हापूर: केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकरी, तरुणांना देशोधडीला लावले आहे. आमच्या शेतकऱ्यांना, तरुणांना घराबाहेर चौकीदार नव्हे, तर घराचा मालक आणि उत्तम शेतकरी बनवायचे आहे. त्यासाठी मोदी सरकारला उलथवून टाका,' असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक आणि हातकणंगलेचे आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ गांधी मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते. गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या ११ हजारावर आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याकडे पंतप्रधानांनी लक्ष दिलेले नाही. बेरोजगारीचा आकडा प्रचंड वाढत असून तरुणांमध्ये नैराश्य आले आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहे.

याशिवाय ऊसाची शेती कशी चांगली होईल यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेवर मी प्रमुख म्हणून आहे, हे मोदींना माहिती नाही. मोदी अकलूज येथील सभेत साखर कारखानदारीवर टीका करत होते. मात्र, त्या सभेतील स्टेजवर त्यांच्या आजूबाजूला बसलेले सर्व लोक साखर उद्योगाशी संबंधित होते आणि हे तिथं माझ्यावर टीका करतात. असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला आहे.टॅग्स