29 December 17:28

मोदी सरकारकडून निर्यात अनुदानात वाढ; मात्र शेतकरी नाराज


मोदी सरकारकडून निर्यात अनुदानात वाढ; मात्र शेतकरी नाराज

कृषिकिंग, नाशिक: केंद्र सरकारनं कांदा निर्यातीच्या अनुदानात वाढ केल्यानंतर व्यापारी आणि बाजार समितीच्या सभापतींनी समाधान व्यक्त केलं आहे. मात्र, या अनुदानाचा फक्त व्यापाऱ्यांना फायदा होणार, असल्याचं सांगून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारने निर्यात अनुदानात जी वाढ केली आहे, त्याचा फायदा हा व्यापाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे "आम्हाला दिलासा द्यायचा असेल तर शासनाने प्रति क्विंटल २०० रुपयाऐवजी किमान ५०० रुपये अनुदान द्यावं", अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

गेल्या दोन महिन्यापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, कांद्याच्या भावात होत असलेली घसरणीला ब्रेक लागावा. यासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यात अनुदानात ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे ते आता १० टक्के इतके करण्यात आले आहे.टॅग्स