18 April 08:30

मॉन्सूनच्या संभाव्य तारखा- आयएमडी


मॉन्सूनच्या संभाव्य तारखा- आयएमडी

कृषिकिंग, नवी दिल्ली: यावर्षी देशभरात सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पडेल. असा आपला पहिला दीर्घकालीन अंदाज सोमवारी (१६ एप्रिलला) भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) जाहीर केला. यासोबतच आता हवामान विभागाने इंफोग्राफिक्सच्या आधारे मॉन्सूनची सुरुवात केव्हा होईल, तो कोणत्या तारखेला देशाच्या कोणत्या भागात असेल, याबाबतच्या संभाव्य तारखाही जाहीर केल्या आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो. दक्षिण भारतातील कर्नाटकची राजधानी बंगलोर, आंध्रप्रदेशची राजधानी हैद्राबाद आणि पूर्वोत्तर राज्य सिक्कीममध्ये मॉन्सून ५ जून पर्यंत पोहचू शकतो. तर १० जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमध्ये दाखल होऊ शकतो.

याशिवाय १५ जूनपर्यंत मॉन्सून गुजरात, मध्यप्रदेश, आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. तसेच देशाची राजधानी दिल्लीसह राजस्थान, हिमाचल प्रदेश, आणि जम्मू-कश्मीरमध्ये मॉन्सून २९ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो. तर १ जुलैपर्यंत मॉन्सून हरियाणा आणि पंजाब या राज्यांपर्यंतचा प्रवास करू शकतो.टॅग्स