12 June 07:10

मॉन्सून प्रगतीप्रथावर, पुढचा आठवडा दिलासादायक: आयएमडी


मॉन्सून प्रगतीप्रथावर, पुढचा आठवडा दिलासादायक: आयएमडी

कृषिकिंग, दिल्ली: नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये प्रगतीपथावर असून पुढील आठवड्यात चांगला पाऊस राहणार असल्याची माहिती आयएमडीचे महासंचालक के. जे. रमेश यांनी दिली आहे.

मॉन्सूनची सद्यस्थिती
मॉन्सून सक्रिय असून मुंबई, महाबळेश्वर आणि कोकण क्षेत्रातील अनेक भागांत तसेच उत्तर कर्नाटकच्या भागात विस्तारत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाल्याने प. बंगालमध्ये मॉन्सूनचा विस्तार होईल.
येत्या आठवड्यात पश्चिम आणि पूर्व भारताच्या क्षेत्रात मॉन्सून चांगली कामगिरी दाखवेल. तथापि, पुढील २४ तासांमध्ये देशभरातील बहुतांश तापमानांमध्ये कमाल तपमानात कोणतेही लक्षणीय बदल होणार नाही आणि त्यानंतर उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानावर पारा २ ते ३ अंशसे. ने वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान आयएमडी ने मागील आठवड्यात मॉन्सूनच्या संभाव्य कामगिरीच्या अंदाजात २ टक्क्यांनी वाढ करत, मॉन्सून सरासरीच्या ९८ टक्के राहू शकेल असे अनुमान वर्तवले आहे. यापूर्वी हे अनुमान ९६ टक्के असे दिले होते. सदर अनुमानात ५ टक्के त्रुटी राहू शकते.