12 June 10:23

मॉन्सून घेणार ८ दिवसांचा ब्रेक- आयएमडी


मॉन्सून घेणार ८ दिवसांचा ब्रेक- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: मॉन्सून १२ जूननंतर आठवडाभराचा ब्रेक घेऊ शकतो. अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवली आहे. सध्यस्थितीत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, त्याची उत्तरेकडील सीमा मुंबई, ठाणे, नगर, बुलडाणा, अमरावती व गोंदिया अशी आहे. औरंगाबादसह उत्तर महाराष्ट्रात मान्सून अद्याप दाखल झाला नसून, १२ जूनपर्यंत तो पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे. त्यानंतर १२ जूनपासून पुढे ८ दिवस अरबी समुद्रातील वातावरणीय बदलांमुळे पावसात खंड पडण्याची शक्यता असून, मॉन्सूनमध्ये एक आठवड्याचा ब्रेक लागण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्यानुसार, “सोमवारी मॉन्सूनने प्रगती करत मराठवाड्याचा आणखी भाग, विदर्भ, छत्तीसगड, वायव्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, आसाम आणि मेघालयाचा काही भाग अशी मजल मारली आहे. महाराष्ट्रात मुंबईसह ठाणे, नगर, बुलडाणा, अमरावती, गोंदिया अशी मॉन्सूनची उत्तर सीमा आहे. आज (मंगळवारी) रात्रीपर्यंत मॉन्सून आणखी पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे. मात्र, १२ जूननंतर मोसमी वाऱ्यांचा जोर काहीसा कमी होऊन मान्सून एक आठवडा थंडावण्याची शक्यता आहे.”टॅग्स