22 July 18:20

मॉन्सून घेणार जुलैअखेर १० दिवसांची विश्रांती


मॉन्सून घेणार जुलैअखेर १० दिवसांची विश्रांती

कृषिकिंग, पुणे: सध्या सर्वदूर पाऊस कोसळत असला, तरी लवकरच तो विश्रांती घेणार असल्याचा अंदाज आहे. मान्सून जुलैअखेर १० दिवसांसाठी विश्रांती घेणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

“मॉन्सून २२-२३ जुलैपासून कमी-कमी होऊन १० ऑगस्टपर्यंत विश्रांती घेऊ शकतो. या १० दिवसांच्या विश्रांती काळात देशातील बहुतांश ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी झालेले दिसेल. अरबी समुद्रावर जमा झालेले मान्सूनचे ढग पुढे सरकत नसल्याने देशाच्या मुख्य भूमीवर पाऊस पडणार नाही, तर तिकडे बंगालच्या उपसागरावर मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे याचा विपरित परिणाम महाराष्ट्रातील पर्जन्यमानावर होईल, असा अंदाज आहे,” असेही हवामान खात्याने सांगितले आहे.टॅग्स