06 June 17:57

मॉन्सून गोव्याच्या वेशीवर, ४८ तासात महाराष्ट्रात कोसळणार


मॉन्सून गोव्याच्या वेशीवर, ४८ तासात महाराष्ट्रात कोसळणार

कृषिकिंग, पुणे: "मॉन्सूनची प्रगती चांगली सुरु असून, त्याने केरळची सीमा ओलांडून गोव्यात प्रवेश केला आहे. आता तो लवकरच कोकणकडे कूच करणार असून, येत्या ४८ तासात मॉन्सून महाराष्ट्रात सक्रीय होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे उद्यापासून पुढील पाच दिवस राज्यभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर पहिले दोन दिवस सर्वत्र मूसळधार पाऊस होणार होईल. त्यानंतर पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मॉन्सून केरळमध्ये वेळेआधी पोहोचला आहे. कारवारच्या वेशीवर रेंगाळलेला मॉन्सून उद्या म्हणजेच गुरुवारी गोव्यात दाखल होणार आहे. त्यामुळे उद्यापासून पुढचे ५ दिवस गोव्यात मुसळधार पाऊस होईल." असा अंदाज गोवा वेधशाळेचे संचालक एम. एल.साहू यांनी व्यक्त केला आहे.

नियोजित वेळेनुसार मॉन्सून ६ जून रोजी गोव्यात दाखल होतो. मात्र, मॉन्सून काहीसा रेंगाळला आहे. मॉन्सूनला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळेच गोव्यात आणि दक्षिण कोकणात उद्या मॉन्सून दाखल होईल असे गोवा वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.