18 January 15:11

मुख्यमंत्री-शेतकरी यांच्या लोकसंवादाचे आज संध्याकाळी सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण


मुख्यमंत्री-शेतकरी यांच्या लोकसंवादाचे आज संध्याकाळी सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण

कृषिकिंग, मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 'लोकसंवाद' कार्यक्रमातून राज्यातील शेतकऱ्यांशी नुकताच संवाद साधला. 'लोकसंवाद' या कार्यक्रमाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' मध्ये दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक १८ जानेवारी २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारण होणार आहे. तर 'दिलखुलास' कार्यक्रमात राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शनिवार दिनांक १९ आणि सोमवार दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यातील शेतकऱ्यांनी दिनांक १४ जानेवारी २०१९ रोजी 'लोकसंवाद' कार्यक्रमात संवाद साधला. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय, महा ॲग्रीटेक योजनेचा शुभारंभ, शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजना, त्यामध्ये आलेल्या अडचणी व यशोगाथा, सूचना अशा अनेक विषयावर मुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधला.