08 December 16:23

मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी मतदान केल्यानंतर शेतात खाल्ली कांदा-भाकर


मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी मतदान केल्यानंतर शेतात खाल्ली कांदा-भाकर

कृषिकिंग, झालावाड(राजस्थान): राजस्थान विधानसभेच्या १९९ जागांसाठी काल (शुक्रवारी) मतदान पार पडले. ७४.०८ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले. मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी झालावाड जिल्ह्यातील झालरापटन विधानसभा मतदार संघात आपलं मतदान केलं.

मतदान केल्यानंतर राजकारणी विशेषतः मतं फिरवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याचे पाहायला मिळतात. मात्र, त्या निवांतपणे पिडावा तालुक्यातील एका शेतात निघून गेल्या. आणि त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत बसून कांदा-भाकरी-दही असे पोटभर जेवण केले. त्यांच्या या साधेपणाची राजस्थानात सर्वत्र चर्चा सुरु आहे.

१ डिसेंबर २०१३ रोजी मागील विधानसभेच्या मतदानाच्या दिवशीही मतदान केल्यानंतर त्यांनी हेच केले होते. त्यावेळीही त्यांनी शेतात बसून कांदा-भाकरीचे जेवण केले होते. आणि विशेष म्हणजे दोन्ही वेळी त्यांनी एकाच डिझाइनची साडी परिधान केली होती.