26 November 10:49

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘यंग लीडर ऑफ द ईयर’ पुरस्कार


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘यंग लीडर ऑफ द ईयर’ पुरस्कार

कृषिकिंग, पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘न्यूज 24' या वृत्तवाहिनीकडून ‘यंग लीडर ऑफ द ईयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करतानाच जनसेवेसाठी अधिक कठोर परिश्रम करण्याचे कृतज्ञ अभिवचन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

न्यूज 24 या प्रसिद्ध वृत्तवाहिनीतर्फे आयोजित ‘जश्न-ए-यंगिस्तान २०१८’ हा पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्लीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करुन देशाचे नाव उंचावणाऱ्या तरुण पिढीतील कर्तबगार मान्यवरांना या सोहळ्यात उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले.

यंदाचे युवा राजकीय नेतृत्व म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, पुणे येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले.