02 September 10:58

मिस्त्र देशातून २,४०० टन कांदा आयात


मिस्त्र देशातून २,४०० टन कांदा आयात

कृषिकिंग, नवी दिल्ली: “देशांतर्गत बाजारपेठेत कांदाचा पुरवठा वाढण्यास मदत होण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांनी जवळपास २,४०० टन कांदा मिस्त्र या देशातून आयात केला आहे. पूर्वीच मागवण्यात आलेला हा कांदा कंटेनरद्वारे जलमार्गाने मुंबई बंदरात उतरवला जात आहे. तसेच ९००० टनाची अजून एक खेप लवकरच मुंबई बंदरात पोहोचणार आहे.” अशी माहिती केंद्रीय ग्राहक आणि संरक्षण मंत्रायालाचे सचिव अविनाश के. श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांबरोबर झालेल्या समीक्षा बैठकीनंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. “मात्र, यानंतरही कांद्याच्या किमती वाढत्याच राहिल्यास अजून कांदा आयातीस मान्यता देण्यात येणार असून, आयात करण्यासाठी व्यापाऱ्यांना तयार राहण्यास निर्देश देण्यात आले आहे.” असेही त्यांनी सांगितले आहे.

तसेच या अधिकाऱ्याने सांगितले आहे की, कांद्याच्या दरात झालेली ही वाढ साठेबाजांमुळे झाली असून, ग्राहक संरक्षण मंत्रालय कांद्याच्या किमतीवर पूर्णपणे लक्ष ठेऊन आहे. किरकोळ बाजारात कांदा ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.टॅग्स