26 July 12:20

माल वाहतूकदारांचा संप सहाव्या दिवशीही सुरूच; लासलगावात कांदा लिलाव ठप्प


माल वाहतूकदारांचा संप सहाव्या दिवशीही सुरूच; लासलगावात कांदा लिलाव ठप्प

कृषिकिंग, लासलगाव(नाशिक): माल वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप सलग सहाव्या दिवशीदेखील सुरूच आहे. खरेदी केलेला शेतीमाल बाहेर पाठवता येणार नसल्याने लिलावात सहभागी न होण्याचा व्यापारी वर्गाने निर्णय घेतला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपासून (२४ जुलै) कांदा, धान्य लिलाव बंद असल्याने जवळपास ६ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज एक हजारांहून अधिक वाहने लिलावासाठी येत असतात. याशिवाय दररोज लासलगाव बाजार समितीमध्ये १७ ते २० हजार क्‍विंटल कांद्याची आवक होत असते. मात्र, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल पाठवण्याची व्यवस्थाच ठप्प असल्याने बाजार समितीतून खरेदी केलेला शेतमाल हा बाहेर पाठवणे शक्य नसल्याने संपूर्ण बाजार समितीत शुकशुकाट दिसत आहे. संप लवकर न मिटल्यास येत्या काही दिवसांत कांद्याचा तुटवडा निर्माण होईल. परिणामी, कांद्याचे बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.

शेतकरी वर्गाने आपला शेतमाल टप्प्या-टप्प्याने विक्रीस आणावा जेणेकरून शेतमालाला चांगला भाव मिळेल, असे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर म्हणाले आहे.टॅग्स