09 January 09:00

माजावर आलेल्या गायी / म्हशी / पारडी / कालवड ह्यांना कधी फळवावे?


माजावर आलेल्या गायी / म्हशी / पारडी / कालवड ह्यांना कधी फळवावे?

स्त्रोत: कृषिकिंग डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८

माजावर आलेल्या गायी / म्हशी / पारडी / कालवड ह्यांना कधी फळवावे?
प्रथमतः गायी/ म्हशी/ पारड्या-रेड्या/ कालवडी ह्यांचे माजचक्र समजावून घ्या. गायी/ म्हशींच्या माजाचा काळ सुरू झाल्यापासून पुढे १८ ते २४ तासापर्यंत टिकतो. ह्या काळात फळविण्याची वेळ महत्त्वाची आहे. माज संपल्यानंतर ८ ते १० तासांनी बिजांडकोशातून मादी बीज निघते. अशावेळी विशिष्ट प्रक्रियेने तयार झालेले शुक्राणु (सीमेन) मादी बीजला फलीत करतात. त्यामुळे माज सुरू झाल्यापासून पुढे १० ते १२ तासातच हे नर बीज (वीर्य) फळविण्याच्या प्रक्रियेने गायी/ म्हशींच्या गर्भाशयात सोडले गेले पाहिजेत. म्हणून गायी/ म्हशींचा माज सुरू कधी होतो हे ओळखता आले पाहिजे. त्यासाठी रोज रात्री ९ ते १० वाजता (म्हणजे झोपे अगोदर) गोठ्यात जाऊन रात्री माजाची लक्षणे बघितली पाहिजेत. म्हणजेच रात्री माजावर दिसलेल्या गायी/ म्हशींना दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत वीर्यदान करण्याची क्रिया झालीच पाहिजे.

- डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82