20 April 16:34

मागील दीड महिन्यात कांद्याचे दर ३० टक्क्यांनी घसरले


मागील दीड महिन्यात कांद्याचे दर ३० टक्क्यांनी घसरले

कृषिकिंग मार्केट रिसर्च: गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना नफा मिळणे तर दूरच...उत्पादन खर्चही मिळत नाहीये. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांतील अनेक बाजार समित्यांमध्ये दर कमी होऊन, तिथे कांदा सध्या २ रुपये ते ५ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. त्यातच आता या कांदा उत्पादक राज्यांमध्ये आवक वाढून, दरात अजून घसरण होऊ शकते. असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे.

१९ एप्रिलला (गुरुवारी) महाराष्ट्रातील औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला किमान २५० रु, कमाल ६५० रु, तर सरासरी ४५० रु. प्रति क्विंटल दर मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला किमान २५१ रु. रुपये, कमाल ८५४ रु. तर सरासरी ६४० रु. प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला किमान २५० रु, कमाल ६०० रु, तर सरासरी ३७५ रु प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

तर तिकडे गुजरातमधील राजकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला किमान ३२५ रु तर कमाल ५७५ रु. प्रति क्विंटल दर मिळाला आहे. राजस्थानमध्येही कांद्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. राजस्थानच्या उदयपुर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला किमान ३०० रु. तर कमाल ८०० रु. प्रति क्विंटल दर मिळत आहे. दिल्ली येथील आजादपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला किमान ३२५ रु. तर कमाल ११२५ रु. प्रति क्विंटल दर मिळत आहे. अर्थात मागील दीड महिन्यांतील कांदा दरांचा विचार करता, गेल्या दीड महिन्यात कांद्याच्या दरात ३० टक्क्यांपेक्षा अधिक घसरण नोंदवली गेली आहे.टॅग्स