25 December 18:47

मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल; याबाबत शंका- शरद पवार


मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल; याबाबत शंका- शरद पवार

कृषिकिंग, सातारा: राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण लागू केले आहे. मात्र, हे मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका आहे, अशी उघड प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे आयोजित राष्ट्रवादीच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.

भाजप सरकराने १६ टक्के मराठा समाजासाठी आरक्षण लागू केले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत आव्हान देण्यात आलेय. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान मराठा आरक्षण जरी लागू झाले तरी मराठा जात प्रमाणपत्र देऊ नका किंवा त्याचे वाटप करु नका, असा स्पष्ट आदेश दिला आहे. त्यामुळे हा भाजप सरकारला मोठा झटका बसला आहे.

याच मुद्द्यावरून बोलताना मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी शंका व्यक्त केली. दरम्यान १०२ व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीचा अभ्यास करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले आहे. या तरतुदीतील मुद्दे सरकारने लक्षात घेतले नसावेत, अशी शंका पवार यांनी यावेळी उपस्थित केली आहे.टॅग्स